PCMC Budget : महापालिकेचा 7 हजार 127 कोटींचा अर्थसंकल्प  सादर 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2023-24 या आर्थिक वर्षांचा मूळ 5298 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 127 कोटी 88 लाख रुपयांचा (PCMC Budget) अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (मंगळवारी) सादर केला. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ, पाणीपट्टी वाढ सुचविली नाही. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) करातून 11 कोटी,   जीएसटीपोटी 2213 कोटी, मालमत्ता करातून 950 कोटी,  गुंतवणूकीवरील व्याजातून 124 कोटी,  पाणीपट्टीतून 88 कोटी, बांधकाम परवाना विभागातून 950, अनुदाने 341 कोटी, भांडवली जमा 601  कोटी, इतर विभागातून जमा 108 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. तर, आरंभिची शिल्लक 5 कोटी 70 लाख दाखविण्यात आली आहे.

Pune News : मेहरबाबा व डेक्कन कॉलेजबद्दलचे एक दिवसीय परिचय सत्र संपन्न

सामान्य प्रशासन विभागावर 1251 कोटी 39 लाख, शहर रचना व नियोजन 166 कोटी 47 लाख, सार्वजनिक बांधकाम 1453 कोटी 33 लाख, आरोग्य 372 कोटी 12 लाख , (PCMC Budget)  स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन 478 कोटी 42 लाख, नागरी सुविधा 561 कोटी, शहरी वनीकरण 518 कोटी, शहरी गरिबी निर्मुलन व समाजकल्याण 171 कोटी, इतर सेवा 244 कोटी, महसुल 73 कोटी  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

 

 

अंदाजपत्रकाची खास वैशिष्ट्य

विकास कामांसाठी 1801 कोटी
स्थापत्य विषयक कामासाठी 846 कोटी
शहरी गरिबांसाठी 1584 कोटी
महिलांच्या विविध योजनांसाठी 48.54 कोटी
दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 45 कोटी
पाणीपुरवठा विशेष निधी 154 कोटी
पीएमपीएमएलकरिता 294 कोटी
भूसंपादनाकरिता 120 कोटी

अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेसाठी 10 कोटी
स्मार्ट सिटीसाठी 50 कोटी

अमृत योजनेसाठी 20 कोटी

क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी तरतूद

अ क्षेत्रीय कार्यालय 23 कोटी 35 लाख
ब क्षेत्रीय कार्यालय 15 कोटी 88 लाख
क क्षेत्रीय कार्यालय 9 कोटी 90 लाख
ड क्षेत्रीय कार्यालय  17 कोटी 11 लाख

इ क्षेत्रीय कार्यालय  7 कोटी 9 लाख
फ क्षेत्रीय कार्यालय 15 कोटी 65 लाख
ग क्षेत्रीय कार्यालय 20 कोटी 10 लाख
ह क्षेत्रीय कार्यालय 32 कोटी 46 लाख रुपयांची तरतूद

 

चिंचवडमध्ये महापालिका इमारत, अग्निशमन प्रशिक्षण केंद्र  

महापालिकेच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. नवीन प्रशासकीय इमारत, अग्निशमन केंद्र, ग्रंथालय सुविधा आणि विविध उड्डाणपूल, रस्ते तयार करण्यात येणार आहेत. (PCMC Budget) पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून ताब्यात आलेल्या जागेत अत्याधुनिक मध्यवर्ती अग्निशमन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 100 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. महापालिका परिसरात मध्यवर्ती ग्रंथालय उपलब्ध नसल्याने प्राधिकरण परिसरात भव्य असे आंतर राष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचे नियोजन केले आहे. मोशी येथे हॉस्पिटलची सुमारे 6 हेक्टर जागा ताब्यात आलेली असून तेथे 750 बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. भविष्यात तेथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे नियोजन आहे.

स्वतंत्र मार्ग सुशोभिकरण करणे

स्ट्रीट स्केपींग प्रोजेक्ट्स मध्ये रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार आराखडे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पादचा-यांसाठी प्रशस्त पदपथ, पार्किंगसाठी राखीव जागा, झाडे लावणे, सायकलसाठी स्वतंत्र मार्ग सुशोभिकरण करणे याचा समावेश आहे. तसेच यामध्ये जागेच्या उपलब्धतेप्रमाणे करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना पदपथावरुन चालणे सुलभ होणार आहे. तसेच सायकल चालविणेस प्रोत्साहन मिळेल. प्रदुषण कमी होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल. त्यात मुंबई – पुणे रस्ता हा 12 किलोमीटर,  टेल्को रस्ता (यशवंतनगर चौक ते फिलिप्स चौक) हा 3.5 किलोमीटर आणि धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर, रावेत हा 1.20किलोमीटर, बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक हा 9.80किलोमीटर हा विकसित केला जाणार आहे.

मोशीत स्टेडीयम

मोशी येथे सुमारे 12 एकर जागेवर विविध खेळांसाठी भव्य स्टेडीयम उभारण्याचे नियोजन आहे.   पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाण पुलामुळे मुंबई-पुणे रस्ता पिंपरी परिसरास थेट जोडण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. मुंबई-पुणे रस्त्यावरुन पिंपरी पुढे पिंपळे सौदागरकडे जाणे सोयीचे होईल. वाल्हेकरवाडी ते औंध रावेत रस्ता पूल व पोहोच रस्ते यामुळे वाल्हेकरवाडी ते ताथवडे येथील औंध रावेत रस्ता जोडला जाणार आहे. यामुळे चिंचवड थेरगाव रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी होईल. यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची जागा महापालिकेस तत्वत: मान्यता मिळाली आहे.

सोशल इम्पॅक्ट बॉन्डच्या माध्यमातून सेवा

महापालिकेच्या वतीने आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा आणि सेवा सक्षमीकरणावर भर दिला आहे. आरोग्यावर 372 कोटींची तरतूद केली आहे. त्यात रूग्णालये उभारणे आणि सेवांचे सक्षमीकरण करणे यावर भर दिला आहे. सोशल इम्पॅक्ट बॉन्डच्या माध्यमातून सेवा सक्षमीकरणावर भर तसेच पीपीपी तत्वावर कॅन्सर रूग्णालय उभारण्यात येणार आहे.मोशी येथे नव्याने 750 बेड्सचे नविन रुग्णालय प्रस्तावित आहे.

तसेच वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. मासुळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय लवकरच सुरु करण्यात येत आहे. तालेरा रुग्णालय येथे नविन रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असुन मल्टिस्पेशालिटी सेवा सुरु करण्यात येणार आहेत.  चिंचवड येथील नविन तालेरा रुग्णालय सुरु केल्यानंतर सद्यस्थितीतील जुने (PCMC Budget) तालेरा रुग्णालयामध्ये रुग्णालय (वृद्धांकरिता) सुरु करण्यात प्रस्तावित आहे. पी.पी.पी. तत्वावर कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याचे नियोजन केले आहे. सोशल इम्पॅक्ट बॉन्डच्या माध्यमातुन आरोग्य सेवांचा दर्जा वाढवून सर्व रुग्णालय व दवाखाने एनएबीएच प्रमाणित करण्यात येणार आहेत.

तसेच थेरगाव रुग्णालयामध्ये ट्रामा सेंटर तसेच पुर्ण क्षमतेने सर्जरी, नेत्रविभाग तसेच कान, नाक, घसा शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात येणार आहे. कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे आकुर्डी रुग्णालय येथे डायलासिस, सर्जरी व अस्थिरोग विभाग सुरु करण्यात येणार आहे. नविन भोसरी येथे ठकउव, कान, नाक, घसा व सर्जरी विभाग सुरु करणयात येणार आहे. वाय. सी. एम. रुग्णालय अद्यायावत करण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व रुग्णालयामध्ये दंतचिकित्सक सुविधा सुरु करण्यात येणार असुन वायसीएमएच. येथे अत्याधुनिक डेंटल सुविधा सुरु करणे प्रस्तावित आहे. महापालिका नवीन ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून स्क्रीनिंग आणि डायग्नोस्टिक्स सुधारण्यात येणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.