Pune News: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून मनपा शाळेतील विद्यर्थ्यांना अनुदानित बस पासेसचे वितरण  

एमपीसी न्यूज: पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतीलप्राथमिक,माध्यमिक व खाजगी शाळेतील इ. 5 वी ते 10वी तसेच पुणे मनपा शाळेतील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक इ. 5 वी ते 12 वी चे विद्यार्थ्यांकरिता पुणे महानगरपरिवहन महामंडळाकडून सन 2021-2022 करिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु करण्यात आले आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे मनपा शाळेतील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक इ. 5 वी ते 12 वी चे विद्यार्थ्यांना व मनपा हद्दीतीलमान्यता प्राप्त खाजगी शाळेतील इ. 5 वी ते 10 वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना पुणे मनपा अनुदानित बस पास वितरणाची योजना सुरू करण्यात आली असून पासेससाठी दि. 20/11/2021 पासून अर्जाचे वाटप करण्यात येत आहे.

भरून दिलेल्या अर्जाची स्वीकृतीमहामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येईल तसेच महामंडळाच्या सर्व पास वरूनसुद्धा फक्त अर्जाचे वाटप करण्यात येईल.महामंडळाच्या सर्वआगारांमध्ये शैक्षणिक संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांनी शाळेकडील विद्यार्थ्यांचेएकत्रित अर्ज आणल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळाप्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांनापासकेंद्रावर येण्याची गरज भासणार नाही.

खाजगी शाळेतीलविद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची 25% रक्कम चलनान्वये पुणेमनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणाकेले नंतर अर्ज,चलन व कागदपत्रे जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरचेपासेस वितरण व्यवस्था दि. 20/11/2021 पासून महामंडळाच्या सर्व आगारांमधून सुरु झालेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.