Pune News : ‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल’ अंतर्गत पीएमपीएमएलकडून 11,022 प्रवासी आणि 7,089 ड्रायव्हर व कंडक्टर यांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड मधील प्रवासी नागरिकांच्या पीएमपीएमएल संदर्भात असणाऱ्या समस्या, सूचना व अभिप्राय जाणून घेण्यासाठी ट्रान्सपोर्ट फॉर ऑल अंतर्गत सर्वेक्षण केले. यामध्ये 11,022 प्रवासी आणि 7,089 ड्रायव्हर्स व कंडक्टर्सचे सर्वेक्षण पार पाडले.

पीएमपीएमएल मार्फत भारत सरकारच्या ‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल’ भाग-1 अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 11,022 प्रवासी तसेच, भाग-2 अंतर्गत 7,089 Informal Public Transport ड्रायव्हर (रिक्षा ड्रायव्हर्स) आणि पीएमपीएमएलच्या ड्रायव्हर व कंडक्टर यांचे सर्वेक्षण पार पडले असल्याचे पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी सांगितले.

पीएमपीएमएलने पुणे विद्यापीठाशी सामंजस्य करार करून ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमातून हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण सर्वव्यापी होण्याच्या दृष्टिकोनातून समाजातील सर्व स्तरातील घटकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये तृतीयपंथी व दिव्यांगांचा देखील समावेश असल्याचे पीएमपीएमएलने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.