Pune News: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 30 जण ताब्यात तर 33 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलिसांनी दिवे घाटातील एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या 30 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 33 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी सासवड परिसरात गस्त घालत असताना त्यांना सासवड येथील हॉटेल विक्टोरिया इन इव्हिनिंग या हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी जुगार चालवणारे आणि जुगार खेळणारे अशा एकूण 30 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एकूण 33 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.