Maharashtra Corona Update : राज्यात आज 15,048 जण कोरोनामुक्त, 13,702 नव्या रुग्णांची वाढ 

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 15 हजार 048 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्याने 13 हजार 702 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या रुग्णांपेक्षा दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 79.64 टक्के झाले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 14 लाख 43 हजार 409 एवढी झाली आहे. त्यापैकी 11 लाख 49 हजार 603 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 2 लाख 55 हजार 281 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात 326 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 38 हजार 084 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 79.64 टक्के झाले आहे.

राज्यात आजवर 71 लाख 11 हजार 204 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 14 लाख 43 हजार 409 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 22 लाख 09 हजार 696 जण होम क्वारंटाइन आहेत तर 27 हजार 939 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुण्यातही रुग्ण संख्येचा आलेख वाढत असून एकूण संख्या ही दीड लाखांच्या जवळ गेली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 15 हजार 399 एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 3 हजार 647 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार 353 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.