Pune News : वीज कंत्राटी कामगारांचे मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन

एमपीसी न्यूज – महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.13) मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सकाळी दहा वाजता हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती निलेश खरात यांनी दिली.

वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकषांनुसार वयोमर्यादेत वाढ करावी, विद्युतसहाय्यक भरती दहावीच्या मार्क मेरिटनुसार न घेता आयटीआय वीजतंत्री व तारतंत्रीच्या मेरिट नुसार करावी, कोरोना काळात शहीद झालेल्या 26 कामगारांना आर्थिक मदत करावी, कामगार कपातीचे धोरण रद्द करून, कार्यरत अनुभवी कंत्राटी कामगाराचा रोजगार जाणार नाही याची ऊर्जामंत्री व प्रशासनाने लिखित खात्री द्यावी. अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.