Pune News : पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत 24  जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

एमपीसी न्यूज- पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत 24 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले (Pune News)आहे. याबाबत आर. राजा, पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी आदेश दिले आहेत.

पुणे शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद व उपोषणासारखे आंदोलनाचे आयोजन करतात. विविध कारणांमुळे तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.

Pune News : वनराई पर्यावरण वाहिनी आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत होणार 20 संघांचे सादरीकरण

त्यामुळे पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

त्यामुळे आर. राजा, पोली उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 च्या कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात

24 जानेवारी 2023 रोजी 1 वा पासून ते 6 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वा. असे 14 दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशांमुळे मनाई करण्यात आली आहे.

अ) कोणताही दहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे

ब) दगड अथवा शस्त्र किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाचे (Pune News)हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे

क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे

ड) कोणत्याही समाजाचे, चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे

इ) मोठ्याने अर्वाच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे

फ) यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेश पूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे, कोणततेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालित आहे.

ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व  सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 च्या कलम 37 (1) (3) विरुद्ध वर्तन करणे

यादरम्यान शासन किंवा मनपा आयुक्त पुणे यांच्या कोरोना विषयक(Pune News)प्रतिबंधक उपाययोजना व मार्गदर्शक तत्वे व त्यातील तरतुदी याही यादरम्यान लागू राहतील.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 च्या कलम 37 चे पोट कलम (3) यानुसार पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त पुणे शहर यांची पूर्व परवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Pune News : पुणे स्टेशनवर नव्याने बांधण्यात आलेला कंपोस्टिंग प्लांट सुरू झाला

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस (Pune News)अधिनियम सन 1951 चे कलम 135 अन्वये शिक्षेस पात्र होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.