Pune News : लॉकडाऊनच्या शक्यतेने पुणेकरांच्या ‘पोटात गोळा’

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रोज तीन ते साडे तीन हजार रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुढील आठवड्यात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पोटात गोळा उठला आहे.

कडक लॉकडाऊन काय असतो, त्याचा पुणेकरांनी अनुभव घेतला आहे. त्यापेक्षा संचारबंदी किंवा इतर कडक नियम घालवून द्यावे, व्यापाऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक वाढताच आहे. कोरोनाचा विचार करता आणखी कडक नियम करण्याची गरज आहे. आहे ते नियम पाळा, मास्क, सोशल डिस्टनसिंग पाळत सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गोरगरिबांना बसतो. त्यामुळे 1 एप्रिलचे खाजगी कार्यक्रम बंद असतील. शिवाय होळी आणि इतर सण समारंभ सार्वजनिकरित्या साजरे करू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.