Pune Crime News : वाघोलीत 55 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – वाघोलीत 55 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कोंढवा खुर्दमध्ये विक्रीसाठी हा गुटखा घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचून गुटख्याचा साठा ताब्यात घेतला. शुक्रवारी (दि.26) सकाळी साडेदहा वाजता वाघेश्वर चौक, वाघोली याठिकाणी युनिट चारनेही कारवाई केली.

याप्रकरणी नरेश देवासी (रा. चिखली), सुरेश भाटी (रा. कोंढवा खुर्द, पुणे), लखन लोंढे (रा. मोशी, ता. खेड) व सुरेश कसाब (रा. चिंबळी फाटा, चाकण) यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नरेश देवासी हा आरोपी सुरेश भाटी याला हा गुटख्याचा साठा विकणार होता. यामध्ये आरएमडी, विमल यासारख्या गुटखा पदार्थांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगर रोडवरुन दोन पिक अप भरुन गुटखा पुणे शहरात घेऊन येणार असल्याची माहिती युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पहाटे वाघेश्वर चौक, वाघोली याठिकाणी सापळा रचून 55 लाखांचा गुटखा जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.