Pune News : अश्लील रॅप सॉंग प्रकरणी अभाविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune News ) एक अश्लील भाषेतील रॅप सॉंग शूट करण्यात आलं होतं. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून पुणे विद्यापीठात तोडफोड केली आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार घोषणाबाजी केली आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली बैठकही उधळून लावली. यावेळी विद्यापीठातील काही वस्तूंची तोडफोडही करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी शुभम जाधव नावाच्या एका तरुणाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक रॅप सॉंग शूट केलं होतं. या रॅप सॉंगमध्ये अश्लील भाषेचा भडीमार होता. विद्यापीठाच्या आवारातील आणि हॉलमधील काही दृश्य या रॅप सॉंगमध्ये होती. हे रॅप सॉंग प्रदर्शित झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला.

Bawdhan : घंटागाडीच्या धडकेत महिला जखमी

विद्यापीठात अशा प्रकारचं गाणं शूट करणाऱ्या विरोधात कारवाई केली जावी अशीही मागणी  (Pune News) जोर धरत होती. त्यानंतर रॅपर शुभम जाधव यांच्या विरोधात चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यापीठाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच विद्यापीठातील हॉलमध्ये सुरू असणारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठकही या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. इतकंच नाही तर काही काचांची आणि वस्तूंची तोडफोड देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.