_MPC_DIR_MPU_III

Pune News : सलून व्यावसायिकांना दरमहा 5 हजार रुपये आर्थिक मदतीला प्रशासनाकडून ‘लाल दिवा’ !

स्थायी समितीने मदतीसंदर्भात महापालिका आयुक्तांकडून मागविला होता अभिप्राय :  समाजातील केवळ एका समुहाला आर्थिक मदत करणे योग्य नसल्याचे नोंदविले मत

एमपीसी न्यूज : कोरोना संकटामध्ये अनेक व्यवसाय बंद होते. त्यामध्ये सलून व्यवसाय देखील ठप्प होते. त्यांना पुणे महापालिकेने दरमहा 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला होता. त्यावर महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय देत समाजात अन्य घटक देखील त्रस्त झाले आहेत. त्यामुळे केवळ एकाच व्यवसाय समुहाला मदत देणे योग्य नसल्याचे कारण देत आर्थिक मदत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

नगरसेवक हरिदास चरवड यांनी शहरातील सर्व सलून व्यवसायिकांना प्रतिमहा 5 हजार रुपये मदतीच्या स्वरुपात द्यावे, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्यावर अंतिम निर्णय घेण्यापुर्वी स्थायी समितीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे अभिप्राय मागितला होता.

_MPC_DIR_MPU_II

त्यावर आयुक्त कुमार यांनी नकारात्मक अभिप्राय दिला. शहरात नोंदणीकृत एकूण 499 हेयर कटिंग सलून आणि 293 ब्युटी पार्लर व्यवसायिक आहेत. त्यांना आरोग्य विभागाकडून व्यवसाय परवानगी दिली जाते.

केवळ सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत दिली तर अन्य व्यवसायिकांकडून मदतीची मागणी येऊ शकते. परिणामी महापालिकेवर आर्थिक ताण येऊ शकतो.

लॉकडाऊन काळात समाजातील सर्वच व्यवसायिकांना त्रास झाला होता. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता केवळ एका समुहाला आर्थिक मदत करणे योग्य नसल्याचे मत अभिप्रायामध्ये नमूद केले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.