Pune News: शिवसेना-मनसे कार्यालय शेजारीशेजारी, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज – राज्यातील प्रत्येक निवडणुकीवेळी ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा ठरलेलीच असते. परंतु आतापर्यंत तरी असं काही घडून आलं नाही. परंतु पुण्यातील एका गोष्टीवरून ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. पुण्यातील सदाशिव पेठेत शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर कार्यालय अगदी एकमेकांना लागून आहे. या दोघांमध्ये फक्त एका भिंतीचा दुरावा आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत तरी हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू झाल्या.

पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या मनसे पक्ष कार्यालयाचे गेल्याच वर्षी राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यानंतर याच पक्ष कार्यालयाच्या बाजूला शिवसेनेच्या प्रज्ञा काकडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाला आहे. त्यामुळे अगदी शेजारी शेजारी असलेले हे दोन्ही पक्ष कार्यालय येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.  दोन्ही पक्षांचे कार्यालय शेजारी शेजारी असल्याने यंदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

यात अजून एक मजेशीर बाब अशी आहे की या दोन्ही पक्षांच्या कार्यालयांमध्ये आम आदमी पक्षाचे कार्यालय देखील आहे. येणाऱ्या निवडणुका अजून लांब असल्या तरी दोन्ही पक्षांमध्ये ही ‘ भिंत ‘ पडणार का अशीच राहणार हे वेळच सांगेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.