Pune crime news : आर्थिक व्यवहारातून अपहरण करणाऱ्या आरोपींना 14 तासात घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज- वानवडी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट 4 यांच्या संयुक्त कामगिरीने  आर्थिक व्यवहारातून वानवडी भागातून अपहरण झालेल्या व्यक्तीस व अपहरण करणाऱ्या आरोपींना 14 तासात (Pune news)ताब्यात घेण्यात आले आहे.

1) दत्तात्रय वारिंगे, वय 29 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे 2) महेश जाधव वय, 32 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे स्टेशन  3) सुभाष सोनजारी, वय 40 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे 4) रवि अंकुशी, वय 34 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे या आरोपींना जेरबंद करण्यात आलेले आहे.

 वानवडी पोलीस ठाण्यात 20 जानेवारी 2023 रोजी रात्री फिर्यादीने  माहिती दिली की त्यांचे मेव्हणे यांना आर्थिक व्यवहारातून वानवडीतील फातिमानगर चौकातील श्री सागर हॉटेल येथे बोलावून घेऊन मारहाण करून जबरदस्तीने अपहरण करून घेऊन गेलेले आहे. याबाबत त्याची पत्नी यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करून अपहरणकर्ते हे 8 लाख रुपये रोख रक्कमेची मागणी करीत असल्याबाबत माहिती(Pune news) मिळाली आहे.

Pune News : बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करून 28 लाख रुपये मागणी करणाऱ्या सावकारास केले जेरबंद

आज 20 जानेवारी 2023 रोजी पुन्हा वरील अपहरण करते यांनी अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका हवी असल्यास तळेगाव दाभाडे येथे 8 लाख रुपये रोख रक्कम घेऊन येण्याबाबत अपहरणकर्त्यांनी घरच्या लोकांना फोनवरून धमकी दिली होती. त्यामुळे वानवडी पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व स्टाफ तसेच पुणे शहर गुन्हे शाखा युनिट कडील युनिट 4 चे  अधिकारी व स्टाफ यांनी संयुक्तिकरित्या अपहरणकर्ते यांना त्यांच्या मागणीप्रमाणे आठ लाख रुपये रोख रक्कम ( बनावट चलनी नोटा सापळ्यांप्रमाणे ) देताना सापळा रचून 4 अपहरणकर्त्यांना जेरबंद करण्यात आलेले आहे.

तसेच अपहरण झालेली व्यक्तीला अपहरण झाल्यापासून अवघ्या  14 तासात सुखरूप सुटका करून ताब्यात घेतलेले आहे.

याबाबत अधिक चौकशी व तपास करून निष्पन्न होणाऱ्या बाबीनुसार तक्रार नोंद पुढील कार्यवाही  वानवडी पोलीस ठाणे कडील तपासी अधिकारी करीत आहेत. ह्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक(Pune news) अजय भोसले हे स्वतः करीत आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.