Pune News : मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा अखेर दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – मंत्रालयासमोर विषप्राशन करून(Pune News) आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसांच्या पत्नी संगीता डवरे यांचे आज निधन झालं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना झालेल्या अपघातानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते. या डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी तक्रार संगीता यांनी केली होती. त्यावर कारवाई होत नसल्याने संगीता यांनी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

 

Shirgaon Murder Update : सरपंच गोपाळे खून प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

डवरे यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डवरे यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचा अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते.

या डॉक्टर यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन डवरे या मंत्रालयात (Pune News) पोहचल्या होत्या. या गोष्टी संदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने त्यांनी मंत्रालयात च 27 मार्च रोजी विष प्राशन केले होते.

अखेर पुण्यातील उपचारा दरम्यान त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.