Pune News : शहरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला, रुग्णांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शहरात डेंगी, टायफॉईड, चिकुनगुनिया, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे.  गेल्या दोन आठवड्यांत या रुग्णांमध्ये सरासरी 7 ते 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शहर परिसरात सततच्या पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोगांनीचा फैलाव शहरात सुरु झाला आहे. तसेच गेल्यावर्षी लॉकडाऊनकाळात लोकांचे बाहेरचे खाणे बंद झाले होते. त्यात गेल्यावर्षी पावसाळ्यातही अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना लॉकडाऊन काळात फारशी सूट नव्हती. त्यामुळे लोकांचा घराबाहेरचा वावर कमी होता. या कारणाने विषाणूजन्य आजाराचे प्रमाण दरवर्षीपेक्षा गेल्यावर्षी कमी झाले होते. पण आता अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. याचा परिणाम आता आरोग्यावर होऊ लागला आहे. परिणामी आजाराचे प्रमाण वाढत आहे.

जुलै महिन्यात शहरात डेंगीचे 107 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 86 जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. याशिवाय ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंगीचे 87 संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 18 जणांना लागण झाली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्येही अनेकजण डेंगीसदृष्य आजारावर उपचार घेत आहेत. यामध्ये संशयित रुग्णांची संख्याही शेकड्यांमध्ये आहे.

जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूचे 65, चिकनगुनियाचे 84, डेंग्यूचे 135 तर मलेरियाचे 2 रुग्ण सापडले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.