Pune : अवघ्या दहा रुपयात दिवसभर करा पीएमपीएमएलमधून प्रवास !

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचा 2020- 21 या आर्थिक वर्षासाठीचा 7 हजार 390 कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आले असून मध्यवर्ती भागात अवघ्या दहा रुपयांमध्ये पीएमपीचा दिवसभर प्रवास करता येणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती भागातील काही मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. ही कोंडी टाळण्यासाठी या भागात माध्यम आकाराच्या गाड्या भाडेतत्वावर आणल्या जातील. या गाड्यांची आसनक्षमता 32 असणार आहे असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. डेक्कन ते पुलगेट, स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानीपेठ, गंजपेठ मार्गे), स्वारगेट- टिळक रस्ता- खजिना विहीर- अप्पा बळवंत चौक- पुणे स्टेशन मार्गे पुलगेट हा वर्तुळाकार मार्ग या गाड्यांसाठी प्रस्तावित आहे. या चारही मार्गावर दिवसभरासाठीचा दर फक्त दहा रुपये असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.