BNR-HDR-TOP-Mobile

Pune : आचारसंहितेचे उल्लंघन; महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा

479
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यावर आदर्श आचारसहिंतेचा भंग केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रशांत मोहन खताळ (वय 30, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दीक्षित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खताळ हे येरवडा कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी आहेत. त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीनगर विधानसभेच्या आचारसहिंता पथकाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

ब्रिजेश दीक्षित यांची 13 मार्च रोजी घोले रस्त्यावरील मेट्रोच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. दीक्षित यांनी ‘पुणे मेट्रो ही नागपूर मेट्रोपेक्षा अधिक गतीने चालविण्याचा प्रयत्न आहे. तसेच, कमीतकमी डिसेंबर अखेरपर्यंत एका लहान विभागात (प्रायोरिटी सेक्शन) तरी चालवण्यात येईल,’ अशी घोषणा केली होती. त्यामुळे आदर्श आचारसहिंतेचा भंग झाला असल्याचे डेक्कन पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, आचारसहिंता लागू झाल्यानंतर कोणतेही आश्‍वासन देण्यास, घोषणा किंवा कामांची जाहिरात करण्यास मज्जाव असतो. देशात 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानंतर कोणतीही घोषणा केल्यास आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला जातो.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.