Pune : 10 जानेवारी रोजी भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर यांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (Pune)(आयएमईडी) तर्फे ‘चेसिंग द एक्स्पोनेन्शियल’ या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता एरंडवणे शैक्षणिक संकुलातील अभिजितदादा कदम सभागृहात हे व्याख्यान होणार आहे.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या हेल्थ सायन्सेसच्या संचालिका डॉ.अस्मिता जगताप, (Pune)भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी,भारती विद्यापीठाचे सहसचिव डॉ.के.डी.जाधव,भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलसचिव जी.जयकुमार उपस्थित राहणार आहेत.आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे,उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक यांनी ही माहिती दिली.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.