PCMC : महापालिका नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार धडे

एमपीसी न्यूज – महापालिकेत सरळसेवेद्वारे पात्र झालेले 250 पेक्षा (PCMC)जास्त उमेदवारांनी कागदपत्रे जमा केली आहेत. सर्व उमेदवार रुजू झाल्यानंतर आणि लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार रूजू झालेल्या 65 कर्मचाऱ्यांना महापालिका कामकाज, नियम व शिस्तीचे धडे देण्यात येणार आहेत.

त्यासाठी खास प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध 15 पदांसाठी 387 जागांसाठी(PCMC)मे महिन्यात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया झाली आहे. त्यांना रूजू करून घेण्यास नोकर भरती निवड समितीने मंजुरी दिली आहे.

त्यातील 213 लिपिक तसेच, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार रूजू झालेल्या 65 कर्मचा-यांना पुण्यातील कोथरूड येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था प्रशिक्षण देणार आहे. विविध गट करून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लिपिकांना सेवेत रूजू करून घेण्यात येणार आहे.

Pune : 10 जानेवारी रोजी भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर यांचे व्याख्यान

स्थापत्य विभागाचे 48 अभियंते, विद्युत विभागाचे 18 कनिष्ठ अभियंते, 74 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा 140 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना महापालिका क्षमता निर्माण आणि संशोधनासाठी मुंबईला पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 46 लाख 58 हजार खर्च अपेक्षित आहे.

महापालिकेचे प्रशासकीय कामकाज, नियम, शिस्तीचे धडे देण्यात येणार आहेत. तसेच, गणवेश कसा असावा. कार्यालयात येणा-या नागरिकांशी तसेच, लोकप्रतिनिधींशी कसे बोलावे व वर्तन कसे असावे, आदी बाबीही समजून सांगण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जाेशी यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.