Chinchwad : ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांचा (Chinchwad)उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या हस्ते वाकड येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया आयोजित उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा वाकड येथे पार पडला. ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासह सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नितीन यादव, आरोग्य सेवेसाठी एम ए हुसेन, सामाजिक कार्यासाठी वाल्मिक कुटे, पर्यावरण संवर्धनासाठी माधव पाटील यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार उमा खापरे,(Chinchwad) माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे, शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख सचिन भोसले, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, आप शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, माजी नगरसेवक मारुती भापकर, विकास मडीगेरी, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, रेखा दर्शिले, युवा सेना प्रमुख चेतन पवार, रोमी संधू, संदीप भालके, तानाजी बारणे, अश्विनी चिंचवडे, विजय दर्शिले, बापूसाहेब गोरे, दादाराव आढाव, भीमराव तुरुकमारे आदी उपस्थित होते.

Pune : 10 जानेवारी रोजी भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर यांचे व्याख्यान

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “पिंपरी चिंचवड शहरात 1997 सालापासून माझा आणि पत्रकारांचा संपर्क सुरू झाला. आज पत्रकारितेत महिलांची संख्या वाढत आहे. शहर वाढत असताना पत्रकारांची संख्या देखील वाढत आहे. लोकप्रतिनिधी काम करत असतात. त्यांचे काम जनतेपर्यंत नेण्याचे काम पत्रकार करत असतात. लेखणी ही तलवार आहे. या लेखणीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम पत्रकार करत असतात. पत्रकारिता हे क्षेत्र आणि त्याच्या कक्षा विस्तारत आहेत. पुरस्कार प्राप्त सर्वांना शुभेच्छा.”

“पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. याबाबत आपण सर्वजण चांगले काम करू असे म्हणत स्वागताध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले यांनी पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन केले.

अरुण खोरे म्हणाले, “सुंदर अक्षर, बातमीत असलेले तथ्य आणि अचूक मांडणी यामुळे विवेक इनामदार यांची बातमीची कॉपी मला आवडत असे. सचोटीने केलेल्या पत्रकारितेमुळे त्यांना आजचा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आजच्या काळात सत्य मांडण्याचे सर्वात मोठे आव्हान पत्रकारांना पेलावे लागत आहे. पत्रकारितेचा सत्व घेणारा कालखंड सध्या सुरू आहे. सध्या पत्रकारितेतील मूल्ये भरकटली आहेत. वाचकांच्या पत्रकारांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. समाजाला आपण मूल्ये दिली पाहिजेत.”

विश्वनाथ गरुड यांनी ‘आजचा डिजिटल मीडिया’ विषयावर मार्गदर्शन केले. श्री गरुड म्हणाले, “डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करताना अनेक बंधने आहेत. ती पाळणे आवश्यक आहे. सोशल मीडिया आणि वृत्त संकेतस्थळे यांच्यात फरक आहे. तो समजून डिजिटल पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. डिजिटल मिडीयाला शासनाने अद्याप मान्यता देण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

डिजिटल क्षेत्रातील पत्रकारांना अनेक ठिकाणी डावलले जाते. डिजिटल माध्यमांची वाचक संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने यासाठी भूमिका घेऊन नोंदणी प्रक्रिया राबवणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी डिजिटल मध्यम क्षेत्रातील आव्हाने आणि संधी बाबत विचार व्यक्त केले.

पुरस्काराला उत्तर देताना विवेक इनामदार म्हणाले, “मी पत्रकारितेची सुरुवात लोकसत्ता वृत्तपत्रातून केली. त्यावेळी अरुण खोरे हे लोकसत्ता दैनिकात मुख्य वार्ताहर होते. आजचा पुरस्कार मला माझ्या गुरूंच्या हस्ते मिळाला याचा मनस्वी आनंद आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यासाठी कुटुंबाने खूप साथ दिली.

सुरुवातीला लोकसत्ता आणि आता एमपीसी न्यूजच्या माध्यमातून आजवर प्रामाणिक आणि विश्वासार्ह पत्रकारिता करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाने पुरस्कारासाठी केलेल्या निवडीबद्दल आयोजकांचे आभार.”

नितीन यादव यांनी पुरस्काराला उत्तर देताना म्हटले की, “पुरस्काराबद्दल मी आभारी आहे. माझ्या कार्याची पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाने दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद.”

ओम हॉस्पिटलच्या वतीने पत्रकारांना प्रथमोपचार किट देण्यात आले. बापूसाहेब गोरे यांनी प्रास्ताविक केले. दादाराव आढाव यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.