Pune : नवरात्रीनिमित्त सनातन संस्थेतर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक ग्रंथप्रदर्शन

एमपीसी न्यूज – सनातन संस्था धर्मशिक्षण,धर्मरक्षण आणि धर्मजागृती यासाठी कार्यरत असून ठिकठिकाणी विविध (Pune)  उपक्रमांच्या आयोजनातून समाजात प्रबोधन करत आहे. नवरात्री निमीत्त 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत चतु:श्रृंगी मंदिर, सेनापती बापट रस्ता, पुणे, तसेच श्री तुळजाभवानी मंदिर, जुना मुंबई-पुणे रस्ता, आकुर्डी या दोन्ही ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे.

हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू असणार आहेत. ‘देवीला कुंकुमार्चन कसे करावे ? देवीची ओटी कशी भरावी ? श्री दुर्गादेवीचा जप कसा करावा ? या विषयीची अध्यात्मशास्त्रीय माहितीचे ग्रंथ ही येथे उपलब्ध असणार आहेत.

Pune : नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील देवीच्या मंदिर परिसरातील वाहतूकीत बदल

ग्रंथसंपदा आणि पूजोपयोगी उत्पादनांचा लाभ घेण्यासाठी कक्षाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7038713883 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.