Kasarwadi : आता जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी गॅसऐवजी क्‍लोरीन पावडर वापरणार

‍एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जलतरण (Kasarwadi) तलावातील पाणी शुध्द करण्यासाठी आता क्‍लोरीन गॅसचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी खबरदारी म्हणून केवळ क्‍लोरीन पावडरचा वापर करण्यात येणार आहे. यापुढे तलावात क्‍लोरीन गॅसचा वापर केला जाणार नाही. क्रीडा विभागाच्या या प्रस्तावास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

सुमित स्पोर्टस ऍण्ड इक्विपमेंटसकडे असलेल्या सहा जलतरण तलावाचा ठेका काढून घेण्यात आल्याची माहिती क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्‍लोरीन गॅसची गळती होऊन 19 जणांना बाधा झाली होती. ही घटना मंगळवारी (दि. 10) घडली होती. वेळीच दक्षता घेतल्याने या दुर्घटनेने मोठे स्वरूप घेतले नाही.

हलगर्जीपणा करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने तलावाच्या ठेकेदारावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

त्यानंतर कासारवाडी जलतरण तलावासह केशवनगर, नेहरूनगर, (Kasarwadi) वडमुखवाडी-चऱ्होली, पिंपरी गाव, पिंपळे गुरव असे सहा जलतरण तलावाच्या कामाचा ठेका सुमित स्पोर्टस ऍण्ड इक्विपमेंटसकडे होता. त्या ठेकेदाराकडून सर्व सहा तलावाचे काम काढून घेण्यात आले आहे.

त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आज सोमवारी ती प्रसिद्ध केली जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या सर्व सहा तलावाचे काम संभाजीनगर तलावाचा ठेकेदार देवा स्विमिंग इक्विपमेंटसकडे देण्यात आले आहे.

Pune : नवरात्रीनिमित्त सनातन संस्थेतर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक ग्रंथप्रदर्शन
दरम्यान, जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी क्‍लोरीन गॅसचा वापर करण्याऐवजी क्‍लोरीन पावडर वापरण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे.

संभाजीनगर येथील जलतरण तलावात क्‍लोरीन पावडरद्वारे पाणी शुद्ध करून त्यांची महापालिकेच्या निगडी, सेक्‍टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रयोग शाळेत चाचणी करण्यात आली. प्रयोगशाळेने पावडर वापरण्याचा सकारात्मक अभिप्राय दिला आहे. त्यानुसार आयुक्त सिंह यांची मान्यता घेऊन या पुढे क्‍लोरीन पावडरचा वापर करूनच तलावातील पाणी शुध्द केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.