BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : खाजगी बस आणि दुचाकी अपघातात एकजण ठार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – लोणावळ्यातील रायवूड येथील मस्जिदसमोर आज सकाळी पावणेबारा वाजता खासगी प्रवासी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला.

आदित्य संजय गोराडे (वय 19, रा. रायवुड पार्क, लोणावळा) असे या मयत झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस (एमएच 14 बीए 9273) ही लग्नांचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या बसला दुचाकी (एमएच 14 ईजी 5494) ही समोरुन जोरात धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठ‍ण्याचे सचिन शिंदे तपास करत आहेत.
HB_POST_END_FTR-A4

.