Pune : शिवसृष्टी झाल्यावर एक लाख लाडू वाटणार -अमोल बालवडकर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची शिवसृष्टी झाल्यावर एक लाख लाडू वाटणार असल्याचा निर्धार भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना आज व्यक्त केला.

काल सर्वसाधारण सभेत काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बालवडकर यांच्यावर टीका केली होती. एक लाख लाडू वाटणार असल्याचे बालवडकर म्हणाले होते, त्याची शिंदे यांनी आठवण करून दिली. शिवसृष्टीचे 10 कोटी रुपये शहरी-गरीब योजनेला देण्याचा विषय होता. त्यावर काँगेस – राष्ट्रवादीने भाजपवर हल्लाबोल केला.

भाजपला शिवसृष्टी करायचीच नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर, 5 कोटी रुपये बालगंधर्व पुनर्वविकासचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बालगंधर्व होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

साधारण 2 वर्षांपूर्वी महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी बिडीपीच्या 50 एकर जागेत उभारणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पण, ही शिवसृष्टी अद्यापही करण्यात आली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.