Pune : विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्लाझ्मा दानाचा निर्णय

Opposition leader Deepali Dhumal and her family decide to donate plasma : पुणे विभागीय आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज – कोरोनावर मात केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे कुटुंबीय प्लाझ्मा दान करणार आहेत. याबाबतचे पत्र पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.

कोवीड – 19 वर आजतागायत कुठलेही रामबाण औषध निघाले नाही. कोवीडबाधित रुग्ण 28 दिवसानंतर कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुस-या बाधित रुग्णाला देता येतो.

कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाइमा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रूग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते.

त्यामुळे कोवीड – 19 आजारातून उपचारा अंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

त्याला प्रतिसाद म्हणून मी, माझे पती प्रदीप धुमाळ आणि माझा मुलगा मनीष धुमाळ हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करणार आहेत. त्याबाबतचे लेखी पत्र पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.

पुणे शहरातील जे जे रुग्ण कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झाले त्यांना देखील प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन आवाहन दीपाली धुमाळ यांनी केले आहे.

प्लाझ्मा दानामुळे कोणताही धोका पोहचत नाही, उलट दोन व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे स्वतः किंवा आपल्या परिचित व्यक्तीला प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही धुमाळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.