Pune : कवी वादळकार यांच्या ‘प्रेम क्लिनिक’ या थिएटर शोचे आयोजन

एमपीसी न्यूज : ‘नक्षत्राचं देणं काव्यमंच’ निर्मित (Pune) ‘प्रेम क्लिनिक’ या थिएटर शोचे १८ डिसेंबर रोजी कर्वे नगर येथील ‘द बेस थिएटर’ येथे आयोजन करण्यात आले आहे. हा बहारदार कार्यक्रम सांयकाळी ५ ते सांयकाळी ७ या वेळेत संपन्न होणार आहे.

यावेळी कवी वादळकार यांच्या प्रेम कवितांची अनोखी काव्यमैफल संपन्न होणार आहे. तरुण-तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या कवितांचा धूडगूस घालणा-या प्रेम कवितांची मैफली संपन्न होणार आहे.

Pune : आपतर्फे चंद्रकांत पाटील यांना शैक्षणिक साहित्य पाठवून निषेध

हा थिएटर शो रसिकांसाठी विनामूल्य आहे. यासाठी मर्यादीत जागा (Pune) आहेत. सहभागी होणा-या रसिकांनी ९६५७३४८६२२ या क्रमांकवर संपर्क साधून आपले फ्री पास घेऊन जाण्याचे आवाहान संस्थेतर्फे करण्यात आले आहे. कविता थिएटरमध्ये आणून तिला प्रतिष्ठा मिळावी, यासाठी या शोचे आयोजन केल्याची माहिती प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.