Pune : पुस्तकांपेक्षा माणसे वाचायला आवडतात, पुणे पुस्तक महोत्सवात राजकीय नेत्यांच्या चर्चेतील सूर

एमपीसी न्यूज – राजकीय नेते वाचत नाहीत हा चुकीचा समज (Pune)आहे. मात्र, पुस्तकांपेक्षा माणसे जास्त व्यामिश्र आहे. त्यामुळे पुस्तकांपेक्षा माणसे वाचायला जास्त आवडतात, असा सूर राजकीय नेत्यांच्या चर्चेत व्यक्त झाला.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर (Pune)आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात ‘माझे वाचन माझा अनुभव’ या विषयावरील चर्चेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष माधव भांडारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी सहभाग घेतला. वसुंधरा काशीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, वृत्तपत्रपासून वाचनाची सुरुवात झाली. पंढरपूरला आजोळी खूप पुस्तके होती. जे मिळेल ते वाचायला आवडते.

शिदोरे म्हणाले, मुख्याध्यापकाचा मुलगा असल्याने महाविद्यालय कायम खुले होते. तिथून वाचन सुरू झाले. घराही वाचनाचे उत्तम वातावरण होते. 2023मध्येच वाचन कमी झाले. इंग्रजी पुस्तके, नियतकालिकांचे वाचन तुलनेने जास्त आहे. सॉल्व्हिंग टफ प्रॉब्लेम्स या पुस्तकाच्या वाचनाने मी राजकारणाकडे आकृष्ट झालो.

Dehuroad : सोमवारी देहूरोड येथील बौद्ध विहारचा वर्धापन दिन

इंग्रजी शिकण्याला पर्याय नाही. त्यासाठी परिश्रम घ्यायला पाहिजेत. इंग्रजी भाषेतील साहित्य मराठीत येण्यात मर्यादा आहेत. आर्ट ऑफ वॉर या मूळ चायनीज पुस्तक, अल्केमिस्ट अशा काही पुस्तकांनी प्रभावीत केले. रिव्हिएल फॉर रॅडिकल्स या पुस्तकाने झपाटले. मला कथात्म साहित्य जास्त आवडते. सातपाटील कुलवृत्तांत हे रंगनाथ पठारे यांचे पुस्तक आवडले. दिवाळी अंक नियमित वाचतो. त्यातून नवे लेखक कळतात.

राज ठाकरे खूप वाचतात. समाजात काम करताना प्रश्न समोर आल्यावर वाचनाची गरज वाटू लागते. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिस्त आवश्यक आहे.

भांडारी म्हणाले, वडील संस्कृतचे विद्वान, शिक्षक असल्याने घरात खूप पुस्तके होती. लहानपणापासून पुस्तकांशी संबंध आला. बालपणापासूनच सुरू झालेले वाचन आजतायगत सुरू आहे. जुन्या पुस्तकांचे संकलन करायला आवडते. १८५०पूर्वीची काही पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. परिश्रम करून इंग्रजी शिकून इंग्रजी पुस्तकेही वाचतो. वेगवेगळ्या भाषांतील चांगले लेखन वाचायला मिळण्यासाठी अनुवादाला पर्याय नाही.

मराठीत अनुवादाची शाखा वाढली पाहिजे. इंग्रजीसह इतर भाषांतून मराठीत लेखन येतानाच मराठी लेखनही इतर भाषांमध्ये अनुवादित होऊन गेले पाहिजे. आर्ट ऑफ वॉर, चाणक्यनीतीमध्ये काही साम्यस्थळे आहेत. कुण्या एकाची भ्रमणगाथा या पुस्तकाने खोलवर परिणाम झाला. रहस्यकथा, भयकथा विशेष आवडतात. नारायण धारप आवडीचे लेखक आहेत. आता कामांमुळे कामापेक्षा अन्य वाचन कमी झाले आहे.

देवेंद्र फडणवीस, अमित शहा उत्तम वाचक आहेत. नरेंद्र मोदीही वाचतात. पूर्वीच्या नेत्यांमध्ये लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन खूप वाचणारे होते.

अटलबिहारी वाजपेयी कमी वाचणारे होते. राजकारणी वाचत नाहीत हा समज खरा नाही. रोज सकाळी वृत्तपत्र वाचूनच सुरुवात होते. लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शाळांना पुस्तके भेट देतो.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विंदा करंदीकर यांच्या कवितेने चर्चेचा समारोप केला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.