Dehuroad : सोमवारी देहूरोड येथील बौद्ध विहारचा वर्धापन दिन

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील बौद्ध विहाराचा 69 वा वर्धापन दिन 25 डिसेंबर (सोमवार) रोजी (Dehuroad) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्यानमार देशातील रंगून (यांगून) येथून गौतम बुद्धांची मूर्ती आणली होती. त्या बुद्ध मूर्तीची 25 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते देहूरोड येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25 डिसेंबर रोजी बौद्ध अनुयायी देहूरोड येथील बुद्ध विहार येथे एकत्र जमतात.

25 डिसेंबर रोजी देहूरोड येथे मोठ्या प्रमाणात बुद्ध अनुयायांची गर्दी असते. रेल्वे विभागाकडून देखील काही विशेष रेल्वे देहूरोड पर्यंत चालवल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी दिले आहेत.

Pimpri : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 20 लाखाचा निधी

जुना मुंबई-पुणे महामार्गावरून देहूरोड सेन्ट्रल चौक ते भक्ती शक्ती या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या मार्गावरील वाहतूक सेन्ट्रल चौकातून उजवीकडे वळून मुकाई चौकातून इच्छित स्थळी जाईल.

जुना पुणे-मुंबई महामार्गाने जाणारी वाहने भक्ती शक्ती चौकातून डावीकडे वळून हँगिंग ब्रिज रावेत, मुकाई चौक मार्ग (Dehuroad) इच्छित स्थळी जातील.

25 डिसेंबर रोजी पहाटे चार ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हा बदल असणार आहे. बुद्ध अनुयायी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सेन्ट्रल चौकातून देहूरोडकडे आणि भक्ती शक्ती चौकातून देहूरोडकडे जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.