Chinchwad : पेरणे फाटा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे (Chinchwad) जयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम 1 जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी लाखो अनुयायी पेरणे फाटा येथे येत असतात. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातून जाणाऱ्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक वळविण्याचे आदेश दिले आहेत.

चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजुकडील जाणा-या व येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. (अनुयायी यांच्या वाहनांना मुभा असेल)

सोलापुर रोडवरुन आळंदी चाकण या भागात येणारी जड वाहने माल वाहतूक टेम्पो /ट्रक ही वाहने हडपसर-मगरपट्टा-खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदीकडे तसेच देहू फाटा चौकात डावीकडे वळून पुढे पुणे नाशिक रोडवरुन चाकण येथे जातील.

मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने माल वाहतूक टेम्पो/ट्रक ही वाहने वडगाव मावळ-एचपी चौक म्हाळुंगे वासोली फाटा- बिरदवडी गाव- रोहकल फाटा-पुणे नाशिक रोड- खेड- मंचर- नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील.

मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने/माल वाहतूक टेम्पो/ट्रक ही चाहने वडगाव मावळ- एचपी चौक म्हाळुंगे- वाघजाईनगर- बिरदवडी गाव- रोहकल फाटा- पुणे नाशिक रोड- खेड- मंचर- नारायणगाव-आळेफाटा मागें अहमदनगर येथे (Chinchwad) जातील.

मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जिप इ. वडगाव मावळ- चाकण चौक खेड- पाबळ शिरुर मार्गे अहमदनगर येथे जातील.

Dehuroad : सोमवारी देहूरोड येथील बौद्ध विहारचा वर्धापन दिन

आळंदी- शेल पिंपळगाव- बहुळ- साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी व येणारी सार्वजनिक/खाजगी प्रवासी वाहतूक पूर्ण पणे बंदी करण्यात येत आहे. (अनुयायी यांच्या वाहनांना मुभा असेल)

आळंदी -मरकळ लोणीकंदकडे जाणारी व येणारी सार्वजनिक/खाजगी प्रवासी वाहतूक पूर्ण पणे बंदी करण्यात येत आहे. (मरकळ गाव, इंद्रायणी नदी पुलावर 9 फुट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट लावले असल्याने त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने तेथुन जावु शकणार नाहीत. त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)

मुंबईकडून देहूरोड येथे जुन्या पुणे मुंबई हायवेने येणारी वाहतूक सेंट्रल चौकातून निगडी – पिंपरी चिंचवडकडे न जाता ही वाहतूक ही सेंट्रल चौकाकडुन मुंबई बेंगलोर हायवेने सरळ वाकडनाका- चांदणी चौकातून इच्छित स्थळी जातील. (अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)

मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने पुणे कडे जाणारी वाहने उर्से टोलनाका येथून मुंबई बेंगलोर हायवेने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता) सरळ वाकड नाका व राधा चौक येथुन पुणेकडे जावु शकतील. (अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)

एसटी बसेस देखील वरील मार्गाने वळविण्यात येणार आहेत. वाहतुकीतील हा बदल 31 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते 1 जानेवारी रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.