Chikhali : परीक्षा सुरु असताना एमबीएचा पेपर फुटला

प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमबीए प्रथम सत्राची परीक्षा (Chikhali)सुरु आहे. शुक्रवारी (दि. 22) परीक्षा सुरु असताना एमबीएचा पेपर फुटला. या पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल झाली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रा. सुनील शामराव धनवडे (वय 52, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परीक्षेला बसलेल्या संबंधित विद्यार्थी अथवा परीक्षा प्रक्रियेत सहभागी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Chikhali)अधिपत्याखाली डॉ. डी वाय पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालय नेवाळे वस्ती, चिखली येथे एमबीएच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरु आहे. परीक्षेसाठी 183 विद्यार्थी बसले आहेत. शुक्रवारी ‘लिगल अस्पेक्टस बिजनेस’ या विषयाचा पेपर होता.

Pimpri : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 20 लाखाचा निधी

पेपर सुरु असताना अज्ञात विद्यार्थ्याने अथवा परीक्षा प्रक्रियेत सहभागी झालेल्या अज्ञात व्यक्तीने ‘लिगल अस्पेक्टस बिजनेस’ या विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.