pune : पुणे पोलिसांकडून कवी वरवरा राव यांच्यासह इतर दोघांना अटक

माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशय

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन आज पहाटे (दि. 28) हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड या ठिकाणी छापे घालून सर्च ऑपरेशन सुरु केले होते. याप्रकरणी या सर्च ऑपरेशनमध्ये कवी वरवरा राव यांच्यासह इतर दोघांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांना रात्री उशिरा पुण्यात आणण्यात येणार असून उद्या न्यायालयासमोर हजार केले जाईल अशी माहिती पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.