Pune Police : बक्षिसांच्या नावाखाली पोलीस उपायुक्तांकडून जवळच्या लोकांवर लाखोंची खैरात

एमपीसी न्यूज : पोलीस दलातील (Pune Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीच्या मूल्यमापनानंतर त्यांना योग्य ते बक्षीस दिले, रिवार्ड दिले जातात. मात्र, पुणे पोलिसांची यावर्षीची रिवार्ड यादी चर्चेचा विषय बनली आहे. बक्षीस देण्याच्या नावाखाली पोलीस उपायुक्तांकडून जवळच्या लोकांवर लाखो रुपयांची खैरात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे जे पोलीस कर्मचारी जीवावर बेतून गुन्ह्याचा तपास करतात अशांना केवळ 200 ते 250 रुपये बक्षीस देण्यात आले आहे. मात्र पोलीस उपायुक्तांच्या गाडीवर ड्रायव्हर असणाऱ्या व्यक्तींना तब्बल 80 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांची ही रिवार्ड यादी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.
पुणे पोलीस दलातील परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी तर या संपूर्ण प्रकरणात कहर केला आहे. पोर्णिमा गायकवाड उपायुक्त असलेल्या परिमंडळात एकूण पाच पोलीस ठाणे आहेत. मात्र, यातील एकाही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला बक्षीस देण्यात आले नाही.

याउलट पौर्णिमा गायकवाड यांच्यासोबत काम (Pune Police) करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना तब्बल 26 रिवार्ड देण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना केवळ पोर्णिमा गायकवाड यांना वेळेत पोलीस आयुक्त कार्यालयात मिटींगला पोहोचवण्यासाठी हे रिवार्ड देण्यात आले आहेत. तर, याच चार कर्मचाऱ्यांना उत्तम पोलीस बंदोबस्त केल्यामुळे हे रिवार्ड देण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिमंडळ तीनच्या कार्यक्षेत्रात चारच कर्मचारी काम करत होते का? असा प्रश्न देखील आता पोलीस दलातूनच विचारला जात आहे.
पोलिसांच्या बक्षिसांची ही यादी जाहीर झाल्यानंतर पोलीस दलातूनच याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. जे कर्मचारी अत्यंत धाडसाने आणि जीवावर बेतून गुन्हेगारांना पकडतात, गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालण्याचे काम करतात अशा कर्मचाऱ्यांना 200 ते 300 रुपये इतके बक्षीस देण्यात आले आहे. मात्र पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांना घरापासून कार्यालयापर्यंत आणि कार्यालयापासून पोलीस आयुक्तालयापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1000 ते 1 लाखाहून अधिक रुपये बक्षीस देण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=W4EaXuyFrUs

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.