Gaja Marne : कुख्यात गुंड गजा मारणे अद्यापही फरार, आश्रय देणाऱ्यावर मोक्का कारवाईचा पोलिसांचा इशारा

एमपीसी न्यूज : एका व्यवसायीकाचे (Gaja Marne) अपहरण करून वीस कोटीची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार गजानन उर्फ गजा मारणे आणि त्याच्या टोळी विरोधात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गजानन मारणे याच्यासह 14 जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली आहे.
दरम्यान येथील चार जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहे. फरार असणाऱ्यांमध्ये गजानन मारणे याचा देखील सहभाग आहे. त्यामुळे गजानन मारणेला आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे, रुपेश कृष्णराव मारणे, सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप, हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील, अमर शिवाजी किर्दत,  फिरोज महंमद शेख, मोनिका अशोक पवार, अजय गोळे, नितीन पगारे, प्रसाद खंडागळे, नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यातील चार जणांना अटक करण्यात आली असून गजानन मारणे याच्यासह इतर आरोपी फरार आहे.
गजानन मारणे आणि त्याच्या टोळीने पुण्यातील (Gaja Marne) एका तरुण व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी कारवाई करत चार जणांना अटक केली होती. गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी संघटितपणे गुन्हेगारी करत स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते.
खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित प्रस्तावाची पडताळणी करून गजानन मारणे आणि त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=W4EaXuyFrUs

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.