Pune : शहरात पोलिसांनी केली 616 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज – संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केलेल्यांची वाहने जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली असून दिनांक 31 मार्च रोजी आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 616 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

तसेच, भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये पोलीसांनी ३४१ नागरिकांवर कारवाई केली आहे आणि १०६९ नागरिकांना नोटीस बजावली आहे.

लॉकडाउनच्या काळात विनाकारण भटकणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीसांनी वाहनजप्तीचे धोरण अवलंबिले आहे. ही कारवाई अधिक परिणामकारक ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.