Pune : भाजप नगरसेवकांकडून महापालिकेला 1 कोटी 94 लाखांचा निधी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील भाजपचे सर्व ९७ नगरसेवक कोरोनाग्रस्तांसाठी वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यातून प्रशासनाला विविध उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होईल, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकाद्वारे दिली.

या विषयाचे पत्र सभागृह नेते धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केले.

जगदीश मुळीक म्हणाले, ‘कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. ते लक्षात घेऊन पुणे शहर भाजपने हा निर्णय घेतला. या निधीचा विनियोग व्हेंटिलेटर, मॉनिटरर्स, ईसीजी मशिन्स, सक्शन मशिन्स, एक्स रे मशिन्स, फॉगर आदी वैद्यकीय उपकरणे आणि स्थानिक स्तरावरील उपाययोजनांसाठी करावा, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.