Pune : 13 पॉईंट रोस्टरप्रकरणी रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – नोकर भरतीत 13 पॉईंट रोस्टर पद्धत लागू करण्याविरोधात रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. तर तसेच भीमा कोरेगावप्रकरणी महाराष्ट्र बंद आंदोलनावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

  • या आंदोलनात उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेविका हिमाली कांबळे, सोनाली लांडगे तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, पूर्वीच्या 200 पॉईंट रोस्टर पद्धतीमुळे अनुसूचित जाती-जमातींना आणि ओबीसीला 49 टक्के मिळत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 13 पॉईंट रोस्टर पद्धती लागू झाल्यास एससी, एसटी आणि ओबीसींना लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर 13 पॉईंट रोस्टर पद्धती लागू करू नये, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.