Pune : पुणे लोकसभा निवडणूक, माझ्या डोक्यात तसे आत्ताच काही नाही – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – आगामी पुणे लोकसभा निवडणुकी (Pune)संदर्भात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारणा केली असता, माझ्या डोक्यात तसे आत्ताच काही नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे मोहोळ यांनी पुणे लोकसभा निवडणुकीतुन माघार घेतल्याची कुजबुज सुरू आहे. तर, दुसरीकडे माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर आणि स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

2014, 2019 पासून पुणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व (Pune)आहे. मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी विजय मिळविला होता. खासदार बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

Pune : लोकसभा निवडणुकीत मविआचं बळ वाढणार – शरद पवार

आता मात्र ही पोटनिवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा पहिल्या क्रमांकावर सुरू होती. मात्र, मोहोळ यांनी स्वतःच भूमिका स्पष्ट केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात माझ्या डोक्यात काहीच नाही. माझ्याकडून कोणतीही तयारी सुरू नाही. भारतीय जनता पक्षात इच्छा व्यक्त करणे आणि मला काय हवं याला काहीही महत्त्व नसतं. संघटनेच्या पातळीवर जो निर्णय घेतला जातो तो सर्वांनाच मान्य करावा लागतो.

पक्ष सांगेल ते करेल माझ्या डोक्यात आत्ता तसे काही नाही, असं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ज्या मोहोळांचं नाव सर्वात प्रथम घेतलं जात होतं त्यांनीच आता लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.