Railway : अनधिकृत 24 हजार फेरीवाल्यांवर रेल्वेची कारवाई; तीन कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे (Railway)व्यवसाय करणाऱ्या 24 हजार 334 जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ या विभागात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आली आहे.

रेल्वे सुरक्षा बलाकडून अशा प्रकारच्या (Railway)वेगवेगळ्या कारवाया कायम सुरु असतात. रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली आहे. रेल्वेत देखील अनेक फेरीवाले साहित्य, खाद्यपदार्थ विक्री करतात. अशा विनापरवाना फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

Pune : पुणे लोकसभा निवडणूक, माझ्या डोक्यात तसे आत्ताच काही नाही – मुरलीधर मोहोळ

एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 24 हजार 339 गुन्हे नोंदवत 24 हजार 334 जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या फेरीवाल्यांकडून तीन कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

विभाग निहाय केलेली कारवाई –

मुंबई विभाग – 9 हजार 394 गुन्हे (9 हजार 393 जणांना अटक – एक कोटी दोन लाख रुपये दंड वसूल)
भुसावळ विभाग – 7 हजार 206 गुन्हे (7 हजार 205 जणांना अटक – एक कोटी 29 लाख रुपये दंड वसूल)
नागपूर विभाग – 3 हजार 181 गुन्हे (3 हजार 179 जणांना अटक – एक लाख रुपये दंड वसूल)
पुणे विभाग – 1 हजार 990 गुन्हे (1 हजार 991 जणांना अटक – 13 लाख 88 हजार रुपये दंड वसूल)
सोलापूर विभाग – 2 हजार 568 गुन्हे (2 हजार 566 जणांना अटक – 25 लाख 87 हजार रुपये दंड वसूल)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.