PCMC TDR : टीडीआर घोटाळ्यात शंका घ्यायला जागा – अजित पवार

एमपीसी न्यूज – वाकडमधील टीडीआर घोटाळ्याच्या (PCMC TDR) आरोपांबाबत मी आयुक्तांना बोलावून माहिती घेतली. कागदपत्रे मागितली, नगरविकास विभागाच्या सचिवांशी बोललो. जरी आयुक्त स्वत:ची बाजू बरोबर असल्याचे सांगत असले तरी देखील तिथे शंका घ्यायला जागा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पवार म्हणाले, मुंबईला गेल्यानंतर मी पुढील गोष्टी करील. परंतु, मला सचिव लोकांनी सांगितले की यासंदर्भात राज्य सरकारला झालेला निर्णय थांबविण्याचा देखील अधिकार आहे. त्यामुळे एखदा बसून नक्की काय झाले आहे काही नाही. खूप मोठ्या प्रमाणावर टीडीआर देण्याचे काम त्यामध्ये झाले आहे असे वेगवेगळ्या लोकांचे म्हणणे आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यात गडबड असेल तर ते थांबविले जाईल.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, राजकारणात कोणीही कोणाच्या भेटी घेत असतात. त्याच्याबाबतीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याची चाचपणी एखाद्याने केली असेल. त्यावेळेस एखाद्याला वाटेत असेल की बुवा, इकडे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, मग तिकडे मिळेल का, या हेतूने पण काही जण तिकडे गेली असतील. काहींना खासदार व्हायचे आहे. माझे आणि त्यांचे काही संभाषण झाले नाही.

परंतु, संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो बघितला आहे. याबाबततीत मी वाघेरे यांना विचारेल. प्रत्येकाला व्यक्ती, मत स्वातंत्र्य आहे. आणि जर अशा पद्धतीने कोणाला घेऊन काही करणार असतील तर याचा अर्थ महाविकास आघाडीला उमेदवार (PCMC TDR) पण नाही. त्यामुळे इकडचे उमेदवार घेण्याचा प्रयत्न चाललाय की काय मला माहिती नाही, असेही पवार म्हणाले.

Railway : अनधिकृत 24 हजार फेरीवाल्यांवर रेल्वेची कारवाई; तीन कोटींचा दंड वसूल

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जे वाटले ते त्यांनी म्हटले. मला जे वाटले ते मी म्हटले. तेच कितीदा उगाळून काढणार आहेत. त्यांनी आव्हान स्वीकारले असेल तर ठीक आता आपण बघा ज्यावेळेस अजित पवार एखादे आव्हान देतो. त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. मी शिरुरमध्ये प्रचाराला जाणारच आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर आणि हडपसरमध्ये जाणार आहे. अमोल कोल्हे यांना मी चांगल्या भावनेने पक्षात आणले. त्यांना खासगीत विचारा की तुम्हाला पक्षात कोणी घेतले.

तिकीट देत असताना त्यांना कोणी शब्द दिले. या सर्व गोष्टी मी इमाने-इतबारे, चांगल्या भावनेने केल्या. परंतु, निवडून आल्यानंतर त्यांच्या काय मनात आले आणि मला राजीनामा द्यायचा असे म्हणत होते. मला त्याबाबत सातत्याने सांगत होते. त्यांना राजीनामा देण्यापासून कोणी थांबविले. सहा विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता. पण, दुर्दैवाने त्यांनी ठेवला नाही. त्यांना आता त्यांचेच मन त्यांना खायला लागले आहे. त्यामुळे पदयात्रा सुरु केल्या आहेत. मी शिरुरमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखविणार म्हणजे दाखविणार असा निर्वाणीचा इशारा पवार यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.