Pune : पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा एल्गार

एमपीसी न्यूज – सरकारी आशीर्वादाने (Pune) भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी  निर्भय बनोचे कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सरसावले. यावेळी महिला, युवती कार्यकर्त्यांची मर्यादा न पाळता सर्वांवरच हल्ला केला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बालगंधर्व चौक येथे आज आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, मोदी सरकार चले जाव, पुणेकरांनो सावधान खतरे में है संविधान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

आपल्या डोळ्यांसमोर पुरोगामी विचारांवर प्राण घातक हल्ला होतो हे पाहून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वयं स्फूर्तीने त्यांना सुरक्षा पुरवली. यानंतर चौथाळलेल्या महायुतीच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला, महिला भगिनींवर युवती कार्यकर्त्यांवर निर्लज्जपणे हात उभारला. या दडपशाहीला न घाबरता यापुढेही पुणे शहरात जिथे अन्याय दिसेल तिथे आदरणीय पवार (Pune) साहेबांच्या विचारांचा सच्चा कार्यकर्ता न्यायासाठी उभा असेल.” अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.

Kalewadi : काळेवाडीत उद्या मातंगऋषी साहित्य संमेलन

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रवींद्र माळवदकर, डॉ.शशिकांत कदम, उदय महाले,मयूर गायकवाड, रूपाली शिंदे,भक्त्ति कुंभार, पायल चव्हाण, ऋतुजा देशमुख, ज्योतीताई सूर्यवंशी, नीताताई गलांडे,आसिफ शेख,सुवर्णा माने,जावेद शेख, मंगल पवार यासह सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह पुरोगामी विचारांवर निष्ठा असणारे सामान्य पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.