Pune : पुणे ग्रामीण पोलिसांनी बोगस आमदाराला पकडले

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात नाकाबंदी सुरू असताना (Pune )पोलिसांनी एका बोगस आमदाराला पकडले. पुणे जिल्ह्यातील सासवड येथे आपल्या चारचाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून हा व्यक्ती फिरत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच त्याच्या गाडीवर असलेला आमदारकीचा लोगो ही हटवला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुरंदर तालुक्यात आमदारकीचा लोगो लावून एक कार फिरत असल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी मिळाली होती. चार चाकी वाहनाच्या समोरील भागात आमदारांच्या वाहनावर असलेला हा लोगो लावून ही गाडी फिरत होती. या गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. मात्र शनिवारी सकाळी जेजुरी परिसरात नाकामध्ये सुरू असताना पोलिसांना आमदारकीचा लोगो लावलेली ही गाडी दिसून आली.

त्यानंतर पोलिसांनी ही गाडी बाजूला घेऊन आतील व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या कारमध्ये आमदार व्यक्ती कोणीही नव्हती. किंवा ही कार गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मालकीची ही नव्हती. त्यानंतर पोलिसांनी ही कार आणि कारवाई लोक जप्त केला आहे. आणि मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई देखील केली आहे. यापुढे जर अशा प्रकारचे लोगो लावून कुठले वाहन दिसून आले तर कायदेशीर (Pune) कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.