Khopoli Accident News : चिमुकल्या ‘विर’चे ते शेवटचे ढोल वादन ठरले

एमपीसी न्यूज- जुन्या पुणे मुंबई महामार्गावर शनिवारी (Khopoli Accident News ) भीषण अपघात झाला. दरीमध्ये बस कोसळून 13 जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुंबईहून पुण्याला हे ढोल पथक आले होते.

 

वीर याला ढोल वाजवण्याचा छंद होता. गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकात तो वादन करायचा. आंबेडकर जयंती निमित्त हे पथक पुण्यातील पिंपळे गुरव परिसरात आले होते.

Maharashtra News : पुढील पाच वर्षात महाराष्ट्र होणार रेल्वे फाटक मुक्त; केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

मात्र वादन संपल्यानंतर पुन्हा घरी परत जात असताना खोपोली जवळ त्यांच्या बसला अपघात झाला. बस खोल दरीत कोसळली आणि यामध्ये तेरा जणांना आपले प्राण गमवावे लागले. चिमुकल्या वीर चे हे आंबेडकर जयंती निमित्त केलेले ढोल वादन अखेरचे ठरले. वीरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर आणि बाजीप्रभू ढोल (Khopoli Accident News ) ताशा पथकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.