Pune : ‘कोरोना’वर मात करण्यासाठी पुणेकरांनी घडविले एकतेचे दर्शन

एमपीसी न्यूज – पुण्यात आज 24 तासांत तब्बल 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण होते. तर, तब्बल 21 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णही आढळून आले. भारत माता की जय, हम सब 1 है म्हणत पुणेकरांनी एकतेचे दर्शन घडविले. ‘कोरोना’वर मात करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत देशभरातील नागरिकांनी आज रात्री नऊ वाजता दारासमोर उभे राहून मेणबत्त्या व पणत्या प्रज्वलित करुन तसेच टॉर्च आणि मोबाईलची लाईट लावून ‘गो कोरोना’चा संदेश दिला.

त्याचप्रमाणे देहूरोड शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देहूरोड थॉमस कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी टेरेसवर भारताचा नकाशा काढून त्यावर पणत्या प्रज्वलित करून ‘इंडिया फाईट’ कोरोना संदेश दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.