Pimpri : पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सगळीकडे दिव्यांची रोषणाई

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सगळीकडे दिव्यांची रोषणाई करण्यात आली. लोकांनी घरातील लाईट बंद करून बाल्कनी, खिडकी, टेरेस आणि दरवाज्यात उभे राहून मेणबत्ती, मोबाइलची टॉर्च व दिवा हातात घेऊन रोषणाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संबोधित करताना अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी आज (रविवारी) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिव्यांची रोषणाई करण्याचे आवाहन केले होते.

पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नऊ वाजता घरातील लाईट बंद करून हातात मेणबत्ती, मोबाइल टॉर्च व दिवा घेऊन रोषणाई केली. काही वेळासाठी सोसायटीमध्ये उत्सवाचे स्वरूप पाहायला मिळाले, शहरात दिवाळीचे वातावरण असल्यासारखे जल्लोष ऐकायला मिळाला. काही ठिकाणी ‘भारत माता की जय’ , ‘वंदे मातरम’ सारख्या घोषणा देऊन जयघोष करण्यात आला. दरम्यान या उपक्रमात लहान थोरांना पासून सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

रात्री नऊ वाजण्याची वाट पाहत असलेल्या कित्येक जणांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला. दरम्यान फक्त दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलची टॉर्च लावूनच रोषणाई करण्याचे सूचना दिली असताना, शहरात काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले तसेच मोठमोठ्याने भोंग्याचा आवाज देखील करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.