Pune : कात्रज भागात रिमझिम तर, शिवाजीनगरमध्ये तुफान पाऊस

एमपीसी न्यूज – उन्हाळा सुरु असला तरी आज दुपारपासून पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पुण्यात आज पाऊस झाला. कात्रज काही भागात रिमझिम तर, शिवाजीनगरमध्ये तुफान पाऊस झाला. तर, काही ठिकाणी झाडे उन्माळुन पडल्याने रस्ता झाला बंद झाला.

सध्या उन्हाळा ऋतू सुरु असून पुणे शहरात लॉकडाऊनची स्थिती आहे. तसेच उन्हामुळे निर्माण झालेल्या उकाड्यानंतर आज पुन्हा एकदा पुणे शहरासह उपनगरातही जोरदार पाऊस झाला. कात्रज, कोंढवा, भारती विद्यापीठ भागात रिमझिम तर, शिवाजीनगर, भवानी पेठ, सदाशिव पेठ, कामगार पुतळा आदी भागात जोरदार पाऊस झाला.

शिवाजीनगरमध्ये तुफान पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रस्ता बंद झाला असून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

त्याचप्रमाणे संध्याकाळी पिंपरी-चिंचवड येथील काही भागात देखील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. सध्या लॉकडाऊन स्थिती असल्याने नागरिक बाहेर अधिक प्रमाणात नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.