Pune : राजीव बजाज यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा आमदार शिरोळे यांच्याकडून निषेध

एमपीसी न्यूज – कोरोना आणला चीनने आणि आपल्या देशात लोकडाऊन जाहीर करून अर्थव्यवस्थेची वाट लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यामुळे कित्येक कामगार उपाशी मरतील. अनेक लोक फ्लूने मरतात. मात्र, अर्थव्यवस्था काही बंद ठेवत नाही, असे वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध उद्योजक राजीव बजाज यांचा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निषेध केला आहे.

बजाज यांच्या सारख्या उद्योजकांनी असे बोलणे बरोबर नाही. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा आहे. कोरोनाचे संकट संपूर्ण जगात आहे. देशाची अर्थव्यवस्था महत्वाची आहेच, मात्र त्यापूर्वी प्रत्येक नागरिकांचा जीव सर्वात महत्वाचा असल्याचे शिरोळे यांनी स्पष्ट केले. एखाद्याला कोरोना झाला तर त्याची लागण जेष्ठ नागरिक, लहान मुलांना होण्याची भीती असते. त्यामुळे केवळ स्वतः पुरता विचार न करता बजाज यांनी असे न बोलले बरे, असेही शिरोळे यांनी म्हटले आहे.

गोरगरीबांची आणि ज्येष्ठांची काळजी घेत नाही तो देशच नाही. कोरोना विषाणू गरीब-श्रीमंत असा भेद जाणत नाही. नोकऱ्या काय परत मिळतील, अर्थव्यवस्था पण पुन्हा उभी राहील, पण एकदा गेलेला जीव परत येणार नाही, एखाद्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक कर्मचाऱ्यांचे जीवन आणि नफा यापैकी एकाची निवड करू शकतो, पण शासन तसं नाही करू शकत आणि करूही नये, असा टोलाही शिरोळे यांनी लगावला.

कोरोना आणला चीनने आणि आपल्या देशात लोकडाऊन जाहीर करून अर्थव्यवस्थेची वाट लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यामुळे कित्येक कामगार उपाशी मरतील. अनेक लोक फ्लूने मरतात. मात्र, अर्थव्यवस्था काही बंद ठेवत नाही, असे विधान उद्योजक राजीव बजाज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.