Pune : बालोत्सव 2.0 ला सुट्टीच्या दिवशी पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पुण्यातील विविध शाळांमधील चिमुकल्या व्यतिरिक्त शनिवारच्या सुट्टीचे (Pune) औचित्य साधून बालोत्सवामध्ये पालक आणि पाल्यांच्या सहभागाने सारसबाग फुलून गेल्याचे दृश्य बघायला मिळाले. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सहकुटुंब बालोत्सवाला भेट दिली. बालोत्सवातील आयोजित सर्व कार्यक्रम आणि विविध सरकारी विभाग आणि स्वयंसेवी संस्थाद्वारे आयोजित बालविकास निगडीत उपक्रमांची माहिती घेत असतांना दिसून आले.

आजच्या दिवशी विशेषकरून पालकांना प्रतिसदात्मक पालकत्व यासाठी उपयोगी असे सोप्या भाषेतील साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये ‘पहिली पायरी’, ‘खेळण्या नको खेळ हवेत’, ‘मुलांसोबतचा संवाद’ ‘बालकांच्या लासिकरणाचे टप्पे’ इ. विषयांवरील माहिती साहित्याद्वारे पालकांना मिळत आहे. पुणे महानरगपालिकेच्या अग्निशामक विभागातर्फे घरातील दुर्घटना कश्या टाळाव्यात याबद्दल जागरूकता केली.

इनोसंट टाइम या संस्थेतर्फे ‘मातेचे मूलजन्मापासूनची 6 वर्षे’ गर्भसंस्कार, ‘मुलांमधील स्वमग्नता (ऑटीजम) लवकर ओळखून त्याचे निर्मूलन’ अश्या विषयांबद्दल पालकांना विशेष मार्गदर्शन करत आहेत. मनशक्ती व स्मार्ट चॅंप्स संस्थे तर्फे मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी, मानसिक ताण कमी करणारे विविध खेळ आणि ‘फिरते माइंड जिम’ उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या खेळांचा पालक आणि मुलांनी (Pune) आनंद लुटला.

स्वरनाद संस्थेतर्फे आयोजित सहजपणे संवाद साधता येतील अश्या गोष्टी आणि पपेट शोला मुले प्रतिसाद देत आहेत. महिला आणि बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी तर्फे 0 ते 3 वयोगटासाठी ‘आरंभ’ आणि ‘3 ते 6’ वयोगटासाठी ‘आकार’ या उपक्रमांतर्गत घरगुती साहित्य वापरुन खेळ बनविणे आणि शाळा पूर्व तयारीच्या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले.

Pune : 220 सरल ॲपचे टार्गेट पूर्ण करणाऱ्या रुपाली कदम ठरल्या पहिल्या बूथ प्रमुख

सेफ किड्स संस्थेने शहर वाहतुकीमधील सुरक्षेच्या जगरुकतेशी निगडीत खेळ शाळेतील मुले खेळतांना दिसून आले. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरातील काना कोपऱ्यातिल शाळेतील मुलांना बालोत्सवात सहभागी करण्यास विशेष प्रयत्न केले. याव्यतिरिक्त मनपाच्या आदर्श बालवाड्या याच्या स्टॉलला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत.

बालोत्सव नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या 75 स्वयंसेवकांनी विशेष सहकार्य करत आहेत. इस्कॉन तर्फे मुलांना खाऊ, नियोजक व स्वयंसेवकाच्या जेवण्याची सोय करण्यात आली. दुपारी 4 वाजेपर्यंत 5840 अधिक मुलांसह आणि 18,620 अधिक नागरिक, सांभाळकर्ते, शिक्षकांनी बलोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सहभाग नोंदविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.