Pune news : मध्य रेल्वे- आरपीएफकडून अमानत ऑपरेशन अंतर्गत प्रवाशांना हरवलेले सामान सुपूर्द

एमपीसी न्यूज : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात आणि केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास जागरुक (Pune news) राहतातच त्याशिवाय जीव वाचवणारे, घरातून पळालेल्या मुलांना शोधणारे/सोडविणारे, हरवलेले सामान शोधून परत मिळविणारे इत्यादी अनेक भूमिका बजावतात.

रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, “अमानत” या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ ने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे आणि त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इ. यासारख्या मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत.

Pimpri Corona Update : शहरात आज 26 नवीन रुग्णांची नोंद; 20 जणांना डिस्चार्ज

चालू वर्षाच्या जानेवारी ते सप्टेंबर 2022 दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफ ने सुमारे 1086 प्रवाशांचे रु. 2.78 कोटी किंमतीचे सामान परत मिळवले आहे.(Pune news) या 1086 प्रवाशांपैकी 570 प्रवाशांचे 1.64 कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. इतर विभागांवर परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य पुढीलप्रमाणे आहेतः

भुसावळ विभागातील 204 प्रवाशांचे सामान रु. 43.83 लाख;

नागपूर विभागातील 134 प्रवाशांचे रु. 28.22 लाख किमतीचे सामान;

पुणे विभाग 128 प्रवाशांचे सामान रु.25.40 लाख किमतीचे सामान;

सोलापूर विभाग: 50 प्रवाशांचे रु. 16.09 लाख किमतीचे सामान.

 

रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचाही सामना करावा लागतो.(Pune news) रेल्वे संरक्षण दलाच्या या शूर सैनिकांच्या कार्याचा सारांश सुरक्षा, सतर्कता आणि सेवा असा करता येईल. त्यांनी अत्यंत समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.