Pune : संजय काकडे यांचा ‘खासदारकीचा’ पत्ता कट; पुढील राजकीय भूमिका थोड्याच वेळात जाहीर करणार

एमपीसी न्यूज – राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी संजय काकडे यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती. मात्र, ती फोल ठरली. या जागेची उमेदवारी डॉ. भागवत कराड यांना देण्यासाठी आली. त्यामुळे आता यापुढील काकडे यांची नेमकी कोणती राजकीय भूमिका असणार?, हे थोड्या वेळातच स्पष्ट करणार आहेत.

2014 मध्ये संजय काकडे हे राज्यसभेचे अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्यात काकडे यांचा मोठा वाटा आहे. 98 नगरसेवक येणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तविले होते. आणि नेमके तेवढेच नगरसेवक निवडून आल्याने भल्याभल्यांना धक्का बसला होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवार निवडून आणण्यासाठी काकडे यांनी जोरदार प्रयत्न केले. तरीही काकडे यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे महापालिकेत काकडे यांना मानणारे तब्बल 30 ते 35 नगरसेवक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काकडे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. ते काय बोलणार, याची उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.