Pune : फातिमानगरात मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; 5 महिलांची सुटका तर एकाला अटक

एमपीसी न्यूज- वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फातिमानगर ( Pune) येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत पाच महिलांची सुटका केली आहे तर एका आरोपीला अटक केली आहे. श्रीधर मोहन साळुंखे (वय 42, पवळे चौक कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमानगर येथील क्लिओज स्पा अँड सलून या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची पोलिसांनी खात्री जमा करून सदर ठिकाणी छापा टाकला असता वेश्याव्यवसाय करताना पाच महिला दिसून आल्या. पोलिसांनी या पाचही महिलांची सुटका करून स्पा मालक श्रीधर साळुंखे याला अटक केली.
आरोपीने पैशाचे अमिष दाखवून या पाच महिलांना मसाज सेंटरमध्ये काम देण्याच्या आमिषाने आणले होते. त्यानंतर या महिलांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तो या ठिकाणी वेश्याव्यवसाय करून घेत होता. पोलिसांनी या पाचही महिलांची सुटका केली असून आरोपीला अटकही केली आहे. वानवडी ( Pune) पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.